हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीसाठीचा सर्वांत लोकप्रिय प्रकार आहे. गुंतवणुकीसाठी अजूनही बहुतेक लोकांकडून एफडीची शिफारस केली जाते. तसे पहिले तर गुंतवणुकीच्या दृष्टीने एफडी हा एक चांगला पर्याय ठरतो. याद्वारे गॅरेंटेड रिटर्न मिळतो. तसेच यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त रिटर्न मिळतो. देशातील प्रमुख बँका, SBI आणि पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिटकडे आकर्षित करण्यासाठी अनेक पर्याय दिले जात आहेत. मात्र, कोणत्याही एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी त्यामधून मिळणाऱ्या व्याजदरांची (FD Rates) तुलना करणे फार महत्वाचे ठरेल.
SBI FD Rate
14 जून 2022 रोजी SBI कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रुपयांच्या FD वरील व्याजदरात (FD Rates) सुधारणा केली.यानंतर आता बँक SBI कडून सर्वसामान्यांसाठी 2.90 टक्के ते 5.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.40 टक्के ते 6.30 टक्के व्याजदर मिळत आहे. SBI चे विविध कालावधीच्या FD चे व्याज दर खालीलप्रमाणे आहेत…
कालावधी व्याजदर
7 दिवस ते 45 दिवस – 2.90 टक्के
46 दिवस ते 179 दिवस – 3.90 टक्के
180 दिवस ते 210 दिवस – 4.40 टक्के
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 4.60 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी – 5.30 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – 5.35 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी – 5.45 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे – 5.50 टक्के
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटचे व्याजदर
बँकांव्यतिरिक्त, आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये देखील एफडी करता येते, ज्याला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट असे म्हंटले जाते.यामध्ये आपल्याला 1 वर्ष ते 5 वर्षांसाठी पैसे जमा करता येतील. यामध्ये 1 वर्ष, 2 वर्षे किंवा 3 वर्षांच्या कालावधीवर 5.5% व्याज दर (FD Rates) दिले जाते. तसेच यामध्ये जर 5 वर्षांसाठी पैसे जमा केले तर 6.7% व्याज मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Multibagger Stocks : घसरत्या बाजारातही ‘या’ 5 स्मॉलकॅप शेअर्सनी दिला 500 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
Silver Price : चांदीमध्ये खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का ???
Multibagger Stock : अदानी ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गाठला सर्वकालीन उच्चांक !!!
Bank FD : ‘या’ तीन बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळत आहे जास्त व्याज !!!
FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकांनी देखील FD वरील व्याजदर वाढवले !!!