हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात लोकं आपल्या भविष्याबाबत फारच जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी लोकांकडून LIC च्या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवले जात आहेत. जर आपणही एलआयसीचे पॉलिसीधारक असाल तर आता आपल्या पॉलिसीचे स्टेट्स घरबसल्या सहजपणे तपासता येईल. याद्वारे आपल्या पॉलिसीचे रिन्यूअल आणि प्रीमियम भरण्याच्या तारखेबाबतची माहिती मिळू शकेल. तर आज आपण घरबसल्या एलआयसी पॉलिसीचे स्टेट्स ऑनलाइन कसे तपासावे ते जाणून घेउयात…
अशा प्रकारे तपासा आपल्या एलआयसी पॉलिसीचे स्टेट्स
सर्वात आधी LIC ग्राहक पोर्टलच्या वेबपेजवर जा.
आता “New User” वर क्लिक करा, यानंतर आपण एनरोलमेंट पेजवर जाल.
जिथे आपला पॉलिसी नंबर, जन्मतारीख, मोबाइल नंबर, प्रीमियमची रक्कम निवडा, ईमेल आयडी आणि लिंग एंटर करा.
यानंतर “I Agree” वर क्लिक करा आणि “Proceed” निवडा.
Yes वर क्लिक करून आपले डिटेल्स (मोबाइल, ईमेल इ.) पुन्हा व्हेरिफाय करा.
आता पुढील पेजवर, आपल्या एलआयसी खात्यामध्ये साइन इन करण्यासाठी पासवर्ड सेट करा.
Login वर क्लिक करा आणि आता आपला User ID/Email/Mobile, Password आणि DOB टाका.
लॉगिन केल्यानंतर, “All Policies” वर क्लिक करा.
यानंतर रजिस्ट्रेशन करताना पॉलिसीचे डिटेल्स एंटर केलेले दिसून येतील.
आता Installment Premium अंतर्गत आपल्या पॉलिसीचे स्टेट्स दाखविले जाईल.
जर आपली पॉलिसी ऍक्टिव्ह असेल तर ती “In Force” दाखवेल आणि आपल्याला पुढील प्रीमियमच देय तारीख दिसेल.
कव्हरेज, बिलिंग माहिती, नॉमिनीची माहिती, क्रियाकलाप इत्यादी तपशील मिळविण्यासाठी पॉलिसीधारकाच्या नावावर क्लिक करा.
SMS द्वारे अशा प्रकारे तपासा LIC पॉलिसीचे स्टेट्स
सर्वात आधी आपल्या फोनमधील Send SMS च्या विभागात जा.
आता कंपोज SMS वर क्लिक करा.
यानंतर मेसेज बॉक्समध्ये ASKLIC XXXXXXXX STAT टाइप करून 9222492224 किंवा 56767877 वर SMS पाठवा.
जर आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड असेल तर SMS द्वारे स्टेट्सची माहिती मिळेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Customer-Services/Policy-Status
हे पण वाचा :
फोनचा Charger सॉकेटमध्ये तसाच ठेवल्याने वीज खर्च होते का ???
होळीला रंग खेळताना Smartphone पाण्यात पडला तर तातडीने करा ‘हे’ काम
Business Idea : ‘या’ वनस्पतीची लागवड करून मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Smartphone वापरताना कधीही करू नका ‘या’ चुका, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान
Recharge Plans : ‘या’ टेलिकॉम कंपन्या 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनअंतर्गत देत आहेत अनेक फायदे