कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
मधुमेहाचा सामना करण्यासाठी आणि मधुमेहाची वाढती समस्या आणि त्यातील गुंतागुंत सोडविण्यासाठी चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटने ४थ्याआंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२० चे आयोजन केले आहे. या परिषदेचा उद्देश मधुमेहाचा पराभव करण्यासाठी अद्ययावत संशोधन व ज्ञानासह आरोग्यसेवा देणाऱ्यांना सक्षम बनविणे असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे.
चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष लाल.एल.चेलाराम म्हणाले की, “चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट नेहमीच मधुमेह आणि त्यामुळे होणारे विविध विकार टाळण्यासाठी आघाडीवर राहिली आहे. या परिषदेद्वारे मधुमेह नियंत्रण व उपचार या विषयाचे नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे मधुमेह व त्यामुळे होणारे दुष्परिणाम या वरील उपचारांवर सकारात्मक प्रभाव पडेल.”
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन म्हणाले की, मधुमेहाविषयी दोन महत्वाची तथ्य म्हणजे: सर्वप्रथम भारतीयांना मधुमेह आणि त्यासंबंधी अन्य विकार होण्याची शक्यता जास्त असते. दुसरे मधुमेहाचे व्यवस्थापनही करता येते आणि तो रोखता देखील येतो. चौथ्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदमध्ये जगभरातून आलेली तज्ञ मंडळी मधुमेह उपचार व काळजी यावर आपले अनुभव व ज्ञान सादर करतील. याचा फायदा भारतीय वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संस्थांना होईल व मधुमेहावर मात करण्यास मदत होईल.
या परिषदेचे उद्घाटन मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर, एव्हीएसएम, व्हीएसएम, एमबीबीएस, एमडी (पेडियाट्रिक्स), डीएनबी (बाल रोग), मेजर जनरल मेडिकल उधमपूर, फेलोशिप पेडियाट्रिक नेफरोलॉजी, एफआयएपी, फेलो फेमर, माजी डीन आणि डेप्युटी कमॅंडेंट आर्म्ड फोर्सस मेडिकल कॉलेज पुणे आणि डॉ. भूषण पटवर्धन, पीएचडी, एफएनएएससी, एफएएमएस, उपाध्यक्ष यूनिवर्सिटी ग्रॅंट्स कमिशन नवी दिल्ली यांच्या हस्ते होणार आहे.
या परिषदेमध्ये रूग्णालयात रक्तातील साखरेचे नियंत्रण, मधुमेह व्यक्तींची काळजी, ग्लूकोजचे प्रमाण, डायबेटीस केअर मध्ये काही नवीन संशोधन, डायबेटीस हार्ट फेल्युअर, इंसुलिन पंप, बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, आठवड्यातून एकदा इंजेक्शन्स, डायबेटीस व्यवस्थापना मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची भूमिका, मधुमेहाचे रिमोट मॉनिटरिंग, मधुमेह रुग्णांची काळजी घेणे या गोष्टींवर चर्चा केली जाणार आहे. या प्रसंगी ४० तरुण संशोधक आपले संशोधन सादर करणार आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.