हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ उतार सुरु आहेत. मात्र या काळातही काही कंपन्या सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून देत आहेत. यामध्ये विष्णू केमिकल्स या स्पेशियलटी केमिकल्स कंपनीचे नावही सामील आहे. या स्मॉल कॅप कंपनीने अवघ्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे एक हजार टक्के इतका मजबूत रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, गेल्या दहा वर्षांत या कंपनीचे शेअर्स सुमारे 4 हजार टक्क्यांनी वाढले आहेत. दरम्यान, आता या कंपनीकडून शेअर्स स्प्लिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, म्हणजेच आता गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्सची संख्या वाढेल मात्र फेस व्हॅल्यूमध्ये घट होईल.
हे लक्षात घ्या कि, 31 ऑक्टोबर रोजी विष्णू केमिकलने स्टॉक एक्सचेंजला याबाबत माहिती दिली होती. या नियामक फाइलिंगनुसार, विष्णू केमिकल्सचे शेअर्स 5:1 च्या प्रमाणात स्प्लिट केले जातील. म्हणजेच आता 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेला एक पूर्ण पेड-अप इक्विटी शेअरला 2 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या 5 पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर्समध्ये स्प्लिट केला जाईल. यासाठी कंपनीच्या बोर्डाकडून मान्यता देखील मिळाली आहे. BSE वरील उपलब्ध माहितीनुसार, भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर तीन महिन्यांत त्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. Multibagger Stock
गुंतवणूकदारांना दिला मोठा रिटर्न
गेल्या 2 वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांच्या भांडवलात 41 पटीने वाढ केली आहे. 2 नोव्हेंबर 2012 रोजी विष्णू केमिकल्सचे शेअर्स 40.75 रुपयांच्या पातळीवर होते, जे आता 4021.96 टक्क्यांनी वाढून 3 नोव्हेंबर 2022 रोजी 1679.70 रुपयांवर पोहोचले आहेत. Multibagger Stock
कंपनीचे शेअर्स 1 वर्षापूर्वी विक्रमी नीचांकी पातळीवर होते
गेल्या वर्षी 22 डिसेंबर 2021 रोजी विष्णू केमिकलचे शेअर्स 771.60 रुपयांच्या पातळीवर होते, जे एका वर्षातील विक्रमी नीचांकी पातळी होती. यानंतर, कंपनीची खरेदी वाढली आणि यावर्षी 8 सप्टेंबरपर्यंत 178 टक्क्यांच्या वाढीसह ती 2,147 रुपयांवर पोहोचली. सध्या त्याचे शेअर्स 22 टक्के डिस्काउंटवर उपलब्ध आहेत. Multibagger Stock
कंपनी बाबत जाणून घ्या
विष्णू केमिकल्स ही कमोडिटी केमिकल्स क्षेत्रातील कंपनी असून ती स्पेशियलिटी केमिकल्स बनवते. ते आंतरराष्ट्रीय कंपन्यांना स्टील, काच, फार्मा, पिगमेंट्स आणि रंगांचा पुरवठा करते. कंपनीच्या आर्थिक गणिताबाबत बोलायचे झाल्यास, तिमाही आधारावर, सप्टेंबर 2022 कंपनीसाठी जास्त चांगला होता. BSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, कंपनीचा निव्वळ नफा जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये तिमाही आधारावर 29.31 कोटी रुपयांवरून 32.56 कोटी रुपयांवर गेला आहे. त्याच वेळी, महसूल देखील याच कालावधीत 303.91 कोटी रुपयांवरून 321.52 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://vishnuchemicals.com/
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा