हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानात हेरगिरीचे प्रशिक्षण देऊन भारतात पाठविण्यात आलेले एक कबुतर जम्मू काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर एका काश्मिरी नागरिकाने पकडले असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावर प्रसिद्ध लेखक चेतन भगत व्यक्त झाले आहेत. यावर बोलत असताना जर या कबुतराने भारतात अंडी घातली तर तिच्या पिलांना आपण भारतीय नागरिकत्व देणार का असा मिश्किल सवाल त्यांनी केला आहे.
“हे कबुतर खरंच हेरगिरी करत होतं का? जर हे खरं असेल तर ते कोणाला रिपोर्टिंग करायचं? जर या पाकिस्तानी कबुतराने भारतात अंडी दिली तर त्याच्या पिल्लांना भारतीय नागरिकत्व देणार का? हे कबुतर CAAच्या कायद्याखाली नागरिकत्वाची मागणी करु शकतं का? तो काही तरी म्हणाला असेल? आपण या प्रकरणाच्या खोलाशी जाऊन चौकशी करायला हवी.” अशा आशयाचं ट्विट चेतन भगतने केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हे संशयित कबुतर हिरानगर परिसरातील मयनारी गावातील नागरिकाने पकडले आहे.
But what exactly does she spy and how exactly does she report back?
And if she lays eggs in India, are the baby pigeons considered Indians? Or maybe they can apply under CAA?
Did she talk? We need to get to the bottom of this.
Best news heard all day. https://t.co/FPWJAMqREy
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) May 25, 2020
हे कबुतर सांकेतिक भाषेत काही संकेत घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले आहे. कबुतराच्या एका पायाला काहीतरी बांधण्यात आले होते. ज्यावर काही क्रमांक लिहिले होते. या सांकेतिक भाषेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न संबंधित अधिकारी करीत आहेत. चेतन भगत यांनी मात्र या विषयावर आपले मिश्किल मत व्यक्त केले आहे. पूर्वीच्या काळी कबुतर संदेश पोहोचविण्याचे काम करत होते. त्यामुळे यामध्ये तथ्य असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”