छ. उदयनराजेचं ठरलं : जिल्हा बॅंकेत गृहनिर्माणमधूनच निवडणूक लढविणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्हा बॅंक सहकारातील अग्रगण्य असल्याचे सांगायला अभिमान वाटतो. बॅंकेच्या माध्यमातून हौसिंग सोसायटी आणि दुग्ध संस्थांचे प्रतिनिधीत्व करताना सहकाराचा जास्तीत जास्त लाभ सभासदांना होण्यासाठी प्रयत्न केला आहे. सभासदांच्या इच्छेनुसार याच मतदारसंघातून मी निवडणूक लढण्याचे निश्‍चित केले आहे. त्यास भरभरुन आशीर्वाद दयावेत, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

सातारा जिल्हा बॅंकेच्या गृहनिर्माण आणि दुग्धविकास सहकारी संस्था मतदारसंघातील मतदार सभासद-कार्यकर्त्यांचा मेळावा येथील हॉटेल लेक व्हयु येथे आज आयोजिला होता.या वेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, गितांजली कदम, कराड नगरपरिषदेचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, महाबळेश्‍वरचे माजी सभापती विजयराव भिलारे, प्रा.आर.के.पाटील, आनंदराव गोळे, जयवंतराव बनसोडे, रत्नमाला निकम, कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, विजयराव भिलारे, भरत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, सहकार चळवळीचा मुळ उद्देश बाजूला पडला असून, शेतकऱ्यांपेक्षा स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नामुळे शेतकरी सभासदांवर होणारा अन्याय एक व्यक्ती म्हणून आम्ही सहन करणार नाही. त्यांचा बंदोबस्त करु, असा घणाघात त्यांनी केला आहे. आपले मत महत्वाचे आहेच, कारण उदयनराजे स्वतःच्या एकट्याच्या मतावर निवडून येऊ शकत नाहीत, हे खरं असलं तरी आपले वैचारिक मत आम्हाला अधिक महत्वपूर्ण आहे, असेही छ. उदयनराजे यांनी सांगितले. शिरीष चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Comment