हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात अतिवृष्टी, महापुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. अनेक अतिवृष्टीचा मोठा फटका पश्चिम महाराष्ट्राला बसला. यात पूरग्रस्तांना राज्य सरकारच्यावतीने मदत पाठविण्यात आली असल्याचे माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली. एकही पूरग्रस्त सरकारच्या अन्न, धान्याच्या मदतीपासून वंचीत राहणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. राज्यावर आलेल्या नैसर्गिक संकटाशी लढताना राज्य सरकार हे खंबीरपणे जनतेच्या पाठीमागे उभे असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
महाराष्ट्रभरात पावसाने हाहाकार माजवल्याला आहे. तर अतिवृष्टीने रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात एकूण 8 ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी राज्य सरकारकडून अन्न, धान्य स्वरूपाच्या दिल्या जात असलेल्या मदतीबाबत न्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, दरडी कोसळण्याच्या घडलेल्या दुर्घटनांमध्ये 70 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी राज्य सरकारकडून पूरग्रस्त जिल्ह्यांना मदतनिधी वितरित करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू, पाच किलो तूरडाळ, पाच लिटर केरोसीन एवढ्या स्वरूपात मदत वाटप करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती मंत्री भुजबळ यांनी दिली.