उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीबाबत छत्रपती संभाजीराजेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणासंदर्भात आज १६ जूनला कोल्हापूर मध्ये खासदार संभाजीराजे यांचे पहिला आंदोलन हे यशस्वीपणे पार पडले. यावेळी मराठा समन्वयकांशी बोलत असताना संभाजीराजे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार जून रोजी आपल्याला भेटण्यासाठी फोन केला होता असा मोठा खुलासा केला आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठी क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले. या आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा नवा खुलासा केलाय.

याबाबत बोलताना ते म्हणाले की, अजित पवार यांनी या आधीसुद्धा मला चार जून रोजी फोन केला होता की आपण मुंबई मध्ये भेटू. पण मी त्यांना सांगितलं आम्ही आमच्या मागण्या मांडल्या आहेत. मी एकटा तुम्हाला कशाला भेटू? उद्या कोणी म्हटलं हे सगळं मॅनेज झालं तर काय करायचं ? त्यामुळे मी ठरवले आहे भेटायचं असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री असले पाहिजेत आणि सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक पाहिजेत त्या वेळीच चर्चा होऊ शकते असा खुलासा आता अजित पवारांच्या भेटीबाबत संभाजीराजेंनी केला आहे.

तसंच यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की राज्य सरकारने जर चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे तर त्याचं स्वागतच आहे. पण मी एकटा चर्चेला जाणार नाही मराठा समन्वयक ठरवतील चर्चेसाठी कोण कोण जाणार. त्यानंतर चर्चेसाठी जाण्याबद्दलचा निर्णय घेऊ असे देखील संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment