शिवरायांच्या महाराष्ट्राची बदनामी विरुद्ध बोलणं हा शिवसेनेचा एकट्याचा विषय नाही- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ठाकरे सरकारवर टीका करताना मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने कालपासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेचा भडीमार होतं आहे. शिवसेना नेते आणि कंगना रणौत यांच्यात शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळत आहे. याशिवाय भाजप कंगनाच्या भूमिकेला थोडं अंतर ठेवून पाठिंबा देताना दिसत आहे. दरम्यान, आज कंगनाने नमते घेत, माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबद्दल मला प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला आहे असं म्हटलं. यानंतर पुन्हा एकदा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवरायांच्या महाराष्ट्राची बदनामी कोणी अशी करत असेल तर हा शिवसेनेचा एकट्याचा विषय नाही, हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे, असे संजय राऊत म्हणाले. भाजपने कंगनाशी असहमती दाखवली असली तरी त्यांनी खोलात जाऊन ही भूमिका मांडली पाहिजे, असे ते म्हणाले. कंगनानं स्वतःचे ट्विटर हँडल स्वतः वापरावे, असा सल्ला त्यांनी दिला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला योग्य ते सुनावले आहे. राज्य सरकार तिच्याबद्दल काय तो निर्णय घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटले आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने आव्हान दिले होते. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असे म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर आता कंगनाने नरमाईची भूमिका घेत जय मुंबई, जय महाराष्ट्र म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

Leave a Comment