मुख्यमंत्र्यांना जन्मदिनी कोट्यवधी रुपये मिळाले पण १०१ रुपयांचा लिफापा वाचून फडणवीसांना दाटला हुंदका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्यसाधून संपूर्ण राज्यातील जनतेला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यातील जनतेने १ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झाले. मात्र देवेंद्र फडणवीस यांना १०१ रुपयांची मनीऑर्डर आली. त्याच्या सोबत आलेले पत्र वाचून हुंदका फुटला आहे.

वेदांत भागवत पवार हा औरंगाबाद जिल्ह्यातील कनकोरी (ता.गंगापूर) या गावाचा पाच वर्षाचा मुलगा आहे. त्याचे वडील वाळूज औद्योगिक वसाहतीत कामगार म्हणून काम करतात. तर आई शेतात मोल मजुरी करते. घरची परिस्थिती अगदीच बेताची. वेदांतला पित्ताशयाच्या कॅन्सर असल्यासाचे डॉक्टरने निदान केले. मात्र त्याच्या आईवडिलांकडे त्याचे ऑपरेशन करायला पैसे नव्हते. त्यामुळे त्याच्या आत्याने मुख्यमंत्र्यांना मोबाईलवरून संदेश पाठवला. त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन वेदांतला उपचारासाठी १ लाख ९० हजाराची मदत केली. यातून वेदांतचा प्राण वाचला.

 

या उपकाराची परतफेड म्हणून वेदांतची आत्या रेणुका सुनील गोंधळी यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसादिवशी १०१ रुपयांची मनीऑर्डर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठवली. त्यासोबत मुख्यमंत्र्यांना एक पत्र देखील लिहले. त्या पत्रातील मजकूर वाचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी १०१ रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठवते आहे. हे पैसे माझ्या मजुरीच्या पैशातून पाठवत आहे. कारण आपण माझ्या भाच्याचे प्राण वाचवले आहेत. याची परतफेड म्हणून मी हि मदत पाठवते आहे. तुम्हाला ईश्वर उदंड आयुष्य देवो. तुमच्या हातून अशीच समाजाची सेवा घडो हीच सदिच्छा व्यक्त करते असा मजकूर या पत्रात लिहला आहे.

Leave a Comment