आंदोलन करताय; कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत सामान्यांसाठी लोकल सुरु करावी या मागणीसाठी भाजपच्यावतीने नुकतेच रेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी मुंबईत भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मुंबईला लोकलचा विषय काढत कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाही, असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित ऑनलाईन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर विरोधकांनी आंदोलने सुरू केली आहेत. अमूक सुरू करा, तमूक सुरू करा, असं सांगत आहेत. अरे आंदोलने कसली करताय? कोरोना हा काही सरकारमान्य कार्यक्रम नाहीये, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खडसावले. .

मीरा भाईंदर येथे प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित ऑनलाईन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

मुंबईत विरोधी भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक कारणांनी टीका केली जात आहे. दरम्यान आज मुंबई येथील मंत्रालयात सापडलेल्या दारूच्या बाटल्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपच्या नेत्यांकडून टोलेबाजी केली जात आहे.

Leave a Comment