हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. याठिकाणी एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी आढावा बैठक घेतली असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करावे, असे निर्देश दिले.
सध्या चिपळूण शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. या ठिकाणी सध्या भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली असून शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तेथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. रेड व ऑरेंज अलर्ट दिला असून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करावे. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा तसेच रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 22, 2021
यावेळी घातलेल्या पुरस्थितीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने कोकण भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे, कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी, मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले.