हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व महापुराचा तडाखा बसला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. “सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सात राज्यात कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी अजून लोकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादावेळी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात अध्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. अशा परिस्थितीत या ठिकाणी महापुराचाही तडाखा बसला आहे. चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातील महापूर, दरडी कोसळलेल्या ठिकाणी सर्वसामान्याप्रमाणे कोरोनाचेही रुग्णही होते. त्यांनाही महापुराचा फटका बसला आहे. या महापुरामुळे कोरोनाबरोबर आता रोगराई पसरण्याचीही भीती निर्माण झाली आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1339815873081291
पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा मी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यामध्ये महत्वाचा निर्णय घेत आम्ही साडे अकरा हजार कोटींचा निधी जाहीर केला. अजूनही अतिवृष्टीचा व महापुराचा तडाखा बसलेल्या भागाला कशा प्रकारे तात्काळ मदत तसेच कायमस्वरूपी योजना करत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.