हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वाढत्या इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या विरोधात जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. या वाढत्या इंधन दरवाढीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोदी सरकारवर निशाणा सोडला. केंद्राकडून सध्या पेट्रोल, डिझेलची जी दरवाढ केली जात आहे ती आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच, असा टोला मुख्यमंत्री ठाकरेंनी लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित आज एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास अहवालाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरत असल्याचे लक्षात आल्याने केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर वाढवायला सुरुवात केली आहे. आपण टीका करतो की पेट्रोल एवढे वाढले, डिझेलचे भाव तेवढे झाले. हे आपल्या भल्यासाठीच होतेय.
Launch of Final Report of Comprehensive Transportation Study https://t.co/Vx48xpRzW2
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 28, 2021
सध्या वारंवार केंद्र सरकारकडून इंधनाची दरवाढ केली जात असल्याने इंधन परवडेनासे झाले आहे. शासन, प्रशासन आपल्या सर्वांची जबाबदारी एक असते. अशावेळी राजकारण एका बाजूला ठेवायचे असते. जनतेला सोयी सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे. ते पार पाडताना त्यात राजकारण येऊ नये. येऊ देणारही नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.