हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8.30 वाजता राज्याला संबोधित करणार आहेत. त्यांच्या संबोधनामध्ये राज्याच्या आणि कोरोनाच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. शिवाय, लॉकडाऊन संदर्भात निर्णय होण्याची शक्यता असणार आहे.
राज्यात अनेक दिवसापासून लॉकडाऊन, कोविड संदर्भातील अनेक नियमावली अजून कडक केले जातील आणि लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व प्रश्नांचे उत्तरे आजच्या संबोधण्यात मिळतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
राज्यात सद्ध्या कारोनाची भीषण अवस्था असून, दररोजचे आकडे डोळे फिरविणारे आहेत. अश्या वातावरणात राज्याकडे लॉकडाऊन शिवाय कुठलाही पर्याय नसल्याचे राज्यातले अनेक मंत्री आणि प्रशासक बोलत असताना या चर्चेला मुख्यमंत्री पूर्णविराम देतील का? हे आज 8.30 वाजता कळेल.