मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिडविषयक बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करुन राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत असा आरोप केला आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात आहे, असा तीव्र आक्षेप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोंदवला आहे. राज्यातील नागरिकांना खरी वस्तुस्थिती कळावी म्हणून हे स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पंतप्रधान श्री. @narendramodi यांच्यासह झालेल्या बैठकीत इंधन दरवाढीबाबत व्यक्त केलेली प्रतिक्रिया (१/२) pic.twitter.com/pvpgLA7Cpl
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 27, 2022
केंद्राकडे 26 हजार 500 कोटी रुपये जीएसटी थकबाकी
“महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या 5.5 टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात (डायरेक्ट टॅक्स) मध्ये महाराष्ट्राचा 38.3 टक्के एवढा वाटा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे 15 टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असे असतानादेखील राज्याला सुमारे 26 हजार 500 कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे”, अशी तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
• मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा.
• पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर.
• राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले, ही वस्तुस्थिती नाही.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 27, 2022
राज्यामुळे पेट्रोल-डिझेल महागले
आज मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये 24 रुपये 38 पैसे केंद्राचा तर 22 रुपये 37 पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात 31 रुपये 58 पैसे केंद्रीय कर तर 32 रुपये 55 पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले ही वस्तुस्थिती नाही असेदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हंटले.
पाईप गॅस वापरण्यास प्रोत्साहन
राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने नैसर्गिक वायूच्या अनुषंगाने याअगोदरच करात सवलत दिली आहे. नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्याकरिता या वायूवरील मुल्यवर्धित कराचा दर 13.5 टक्क्यांहून कमी करून तो 3 टक्के करण्यात आला आहे. पाईप गॅसधारकांना लाभ दिला आहे तसेच वाहतूकदारांनाही याचा लाभ मिळत आहे. यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यात पाईप गॅस वापरण्यास मिळत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.