औरंगाबाद – चिकलठाणा विमानतळाचे विस्तारीकरण, रुंदीकरण, इमिग्रेशन चेक पोस्ट, विमान कंपन्यांच्या फेरा वाढविण्यासंदर्भात आज दुपारी दीड वाजता केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीत राजीव गांधी भवन नवी दिल्ली येथे बैठक होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाचे प्रश्न प्रलंबित असून, प्रामुख्याने धावपट्टीच्या विस्तारीकरण आणि रुंदीकरण उडान योजने अंतर्गत देशातील प्रादेशिक शहरांना जोडण्यासाठी विमान सेवा सुविधांवर बैठकीत निर्णय होणे शक्य असल्याचे डॉ. कराड यांनी कळवले आहे.
बैठकीसाठी हवाई वाहतूक सचिव संजय सिंग, विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार, नागरी उड्डाण समितीचे राजीव गोयंका, हवाई वाहतूक सचिव राजू बंसल, फ्लाय बिग एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मांडवीया, ड्रग्स कंट्रोलर डॉ. सोमानी यासह इमिग्रेशन चेक पोस्ट संदर्भात गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुमंत सिंग, सीएमआयचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, उद्योगपती मुकुंद कुलकर्णी, औरंगाबाद फर्स्टचे प्रितेश चटर्जी उपस्थित राहणार आहेत.