डोनाल्ड ट्रम्प यांचा संभावित पराभव कंगनाच्या जिव्हारी; म्हणाली…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव निश्चित मनाला जात आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी निवडणुकीत निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळं ट्रम्प यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. मात्र, ट्रम्प यांचा संभावित पराभव बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या जीवरे लागला आहे. ट्रम्प सत्तेत नसल्याचा सर्वाधिक फायदा चीनला होणार असल्याचे कंगना म्हणाली आहे. याशिवाय तिने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने राष्ट्रवादाबद्दल बोलताना ट्रम्प यांचं कौतुक केलंय.

ट्रम्प यांच्यात कितीही वाईटपणा असेल, पण एक गोष्ट सत्य आहे ती म्हणजे, ते चायनीज व्हायरला चायनीज व्हायरस असेच म्हणतात. रेडिकल्स इस्लामिक दहशतवादाला असे नाहीत म्हणत की, दहशतवादाचा कुठलाही धर्म नसतो. त्यामुळे, ट्रम्प सत्तेत नसल्याचा सर्वाधिक फायदा चीनला होईल, जो देश दहशतवादाचा प्रसार करतो, त्या देशालाच फायदा होईल, असेही कंगनाने म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या समर्थकांना संबोधित करताना, राष्ट्राध्यक्ष होताच आपण कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कठोर नियम लागू करणार आहोत, असे संकेत दिले आहेत. सध्या अमेरिकेतील निवडणुकांचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. मात्र, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव निश्चित मानला जात आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment