रशिया -युक्रेन युद्धादरम्यान चीनने घेतला ‘हा’ निर्णय; भारताची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीजिंग । रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगभर दिसू लागला आहे. आता ज्याचा परिणाम इतर देशांच्या संरक्षण बजेटवरही दिसून येत आहे. आता चीनही आपल्या संरक्षण बजेटमध्ये प्रचंड वाढ करणार आहे. चीनने शनिवारी आपल्या संरक्षण बजटमध्ये 7.1 टक्के वाढ करून 230 अब्ज डॉलर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गेल्या वर्षीच्या 209 अब्ज डॉलरच्या तुलनेत हे $21 अब्ज जास्त आहे.चीनच्या या निर्णयाने भारताची चिंता वाढू शकते.

पंतप्रधान ली केकियांग यांनी शनिवारी नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) मध्ये सादर केलेल्या मसुद्याच्या अर्थसंकल्पाचा हवाला देत सरकारी चायना डेलीने म्हटले आहे की,”चीन सरकारने 2022 या आर्थिक वर्षासाठी 1.45 ट्रिलियन (ट्रिलियन) युआनचे संरक्षण बजेट प्रस्तावित केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 7.1 टक्के जास्त आहे.”

भारताच्या तिप्पट
या वाढीमुळे भारताच्या संरक्षण बजटच्या (सुमारे $70 अब्ज) तुलनेत चीनचे संरक्षण बजट तिप्पट झाले आहे. गेल्या वर्षी चीनचे संरक्षण बजेट 200 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले होते. चीनने आर्थिक वर्ष 2021 मध्ये आपल्या संरक्षण बजटमध्ये 6.8 टक्क्यांनी वाढ करून त्याचे एकूण संरक्षण बजट 209 अब्ज डॉलरवर नेले.

चीनच्या पंतप्रधानांनी संसदेत सादर केलेल्या कामाच्या रिपोर्टमध्ये, “पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या युद्ध तयारीला मोठ्या प्रमाणावर बळकट करण्यावर” भर दिला. वाढत्या राजकीय आणि लष्करी तणावादरम्यान हे आले. संरक्षण बजटवरील खर्चाच्या बाबतीत अमेरिकेनंतर चीन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

भारताचे संरक्षण बजट
भारताचे वर्षासाठी म्हणजे 2022-23 साठी एकूण संरक्षण बजट सुमारे 5.25 लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2021-22 मध्ये एकूण संरक्षण बजट 4.78 लाख कोटी रुपये होते. यंदाच्या संरक्षण बजटमध्ये नवीन शस्त्रे, लष्करी उपकरणे आणि लष्कराच्या इतर आधुनिकीकरणासाठी (लष्कर, हवाई दल आणि नौदल) एकूण भांडवली खर्च 1.52 लाख कोटी रुपये ठेवण्यात आला आहे. हा भांडवली खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 12 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी भांडवली खर्च 1.35 लाख कोटी रुपये होता.