पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये भेट दिल्याने चीनचा जळफळाट, म्हणाला..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लडाख भेटीवर नाराजीचा सूर लावला आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये संवाद सुरु आहे. लष्करी तसेच राजकीय चर्चेच्या माध्यमातून या भागातील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. अशावेळी कोणत्याही पक्षाने या प्रदेशामधील तणाव वाढणारं पाऊल उचलू नये,” असं मत चीनच्या चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन यांनी व्यक्त केलं आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या या वक्तव्यानंतर चीनचा जळफळाट झाला असल्याची चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान मोदींनी निमू येथील फॉरवर्ड पोस्टवर तैनात असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची आणि सैनिकांची मोदींनी भेट घेतली. येथील परिस्थितीचा मोदींनी आढावा घेतला असून नक्की या परिसामध्ये कशापद्धतीने सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मोदींना दिली. निमू येथे तैनात असणाऱ्या लष्कराच्या जवनांबरोबरच हवाई दलाचे अधिकारी आणि आयटीबीपी म्हणजेच इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्सच्या जवानांशीही मोदींनी संवाद साधला.

आपल्या लडाख दौऱ्यात जवानांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी चीनला चांगलंच सुनावलं. आता विस्तारवाद समाप्त झाला असून आता हे युग विकासवादाचे आहे. जलदगतीने बदलणाऱ्या या काळात विकासवाद हाच प्रासंगिक आहे. विकासवादाला आज संधी आहे आणि विकास हाच आधार आहे. गेल्या शतकात विस्तारवादानेच मानवजातीचा विनाश केला. कोणाच्या डोक्यात जर विस्तारवादाची जिद्द असेल तर ते नेहमीच विश्वशांतीपुढे एक संकट ठरते, अशा शब्दात मोदींनी चीनचे नाव घेता टोला लगावला. दरम्यान, भारत-चीन सीमेवर पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या हिसेंमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरामधून संताप व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या अचानक ठरलेल्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे.\

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment