चिनी हॅकर्स SBI च्या ग्राहकांचे खाते अवघ्या काही क्षणातच करीत आहेत रिकामे, ‘या’ हॅकर्सविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपण भारतीय स्टेट बँकेचे (SBI) ग्राहक असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सध्या अनेक चिनी हॅकर्स स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांवर लक्ष ठेवून आहेत. चिनी हॅकर्स SBI ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढत आहेत. वास्तविक, चिनी मूळचे हॅकर्स फिशिंगद्वारे बँक युझर्सना लक्ष्य करीत आहेत. यासाठी हॅकर्स एक विशेष वेबसाइट लिंक वापरून ग्राहकांना त्यांचे KYC अपडेट करण्यास सांगत आहेत. त्या बदल्यात 50 लाख रुपयांच्या फ्री गिफ्टची ऑफर दिली जात आहे.

सायबर सुरक्षा संशोधकांनी SBI ग्राहकांसाठी चेतावणी जारी केली आहे. SBI ने आपल्या ग्राहकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. बँकेकडून यामध्ये सांगितले गेले की,’फक्त एक SMS आपली बँकेतील शिल्लक साफ करू शकेल, तेव्हा सावध रहा.’

हॅकर्स ग्राहकांना जाळ्यात कसे ओढतात हे जाणून घ्या
हॅकर्स SBI ग्राहकांचा उपयोग WhatsApp आणि SMS द्वारे KYC अपडेट करण्यासाठी करतात. यासाठी मेसेजमध्ये वेबसाईटची लिंकदेखील देतात. या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून युझर्सना SBI च्या बनावट वेबसाइटवर री-डायरेक्ट केले जाते. येथे दिलेल्या Continue to Login बटणावर क्लिक केल्यावर, युझर्सना आणखी एका पेजवर री-डायरेक्ट केले जाते, जेथे त्यांना कॅप्चा कोडसह युझर नेम आणि पासवर्ड एंटर करण्यास सांगितले जाते. ही माहिती एंटर होताच ती थेट हॅकर्सपर्यंत पोहोचते. त्यानंतर ते पासवर्ड बदलून आपले खाते काही मिनिटांत रिकामे केले जाते.

50 लाखांच्या गिफ्टची ऑफर
त्याचबरोबर काही मेसेजेसमध्ये SBI कडून 50 लाख रुपयांचे गिफ्ट देण्याविषयीही सांगितले जाते. लोकांना असे घोटाळे टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. राजधानी दिल्लीस्थित सायबरपीस फाऊंडेशन आणि ऑटोबॉट इन्फोसेक प्रायव्हेट लिमिटेडने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने होणाऱ्या फसवणूकीचा संयुक्तपणे अभ्यास केला आहे. संशोधकांच्या मते, ज्या वेबसाईटची लिंक ग्राहकांना देण्यात आली आहे, त्याचे सर्व डोमेन नावांच्या रजिस्ट्रेशन असलेला देश चीन आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment