सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
अटल भुजल योजनेच्या माध्यमातून जे भूजल उपलब्ध होत आहे. त्या भूजलाचे लोकसहभागातून सिंचनाकरिता भूजलाचा कार्यक्षम वापर करून जास्तीत जास्त भूजलाची बचत करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयुक्त चिंतामणी जोशी यांनी केले.
केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना अंतर्गत सातारा जिल्ह्यातील उकीर्डे गावाला भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयुक्त चिंतामणी जोशी यांनी नुकतीच भेट दिली. भेटीदरम्यान त्यांच्या हस्ते पिझो मीटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी भेटीदरम्यान आयुक्त चिंतामणी जोशी यांनी उपस्थित सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक महिला व पोलिस पाटिल आशा वर्कर रोजगार सेवक ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून अटल भूजल योजनेबाबत मार्गदर्शन केले. तसेच तयार करण्यात आलेल्या जलसुरक्षा आराखड्या बाबत सर्वांशी चर्चा केली.