शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेनेच्या ‘या’ आमदारावर दाखल करा; चित्रा वाघ यांची मागणी

Chitra Wagh Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महिलांना शक्ती देणारा शक्ती कायदा राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला. यानंतर विधानभवनात शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी भाजप बाबत केलेल्या एका विधानानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा अजय चौधरी यांच्यावर दाखल करावा असे म्हंटल आहे

महिलांबाबत शिवसेनेचा काय दृष्टीकोन आहे हे आमदार अजय चौधरी यांच्या आजच्या विधानातून दिसून आलंय… त्यांनी महिलांना अपमानित करणारी भाषा वापरलीय. माझी राज्य सरकारला विनंती आहे याची दखल घेत शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदार अजय चौधरींवर दाखल करावा.. अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली

सभागृहात नेमकं काय घडलं –

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीवरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. यावेळी महिलांचा आदर झाला पाहिजे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटल्यानंतर शिवसेना आमदार यांनी भाजपवर टीका करताना म्हंटल की, एरवी भाजपच्या महिला पदाधिकारी जरासं काही झालं की, लगेच सावित्रीच्या लेकींवर अन्याय झाला म्हणून बोंबलत, ओरडत सुटतात. मग मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ही सावित्रीची लेक नव्हे का, असा सवाल केला. त्यांच्या बोंबलत या शब्दावर भाजपने आक्षेप घेतला.