पूरग्रस्तांना आजपासून 5000 रुपयांची आर्थिक मदत; अन्नधान्यही मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने जोर धरला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत होऊन बसले आहे. जोरदार पावसामुळे अनेक घरांचे तसेच लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पिकांबरोबर घरांची पडझड, खतांची नासाडी असे नुकसान देखील शेतकऱ्यांचे झाले आहे. यामुळे राज्यातील बिकट परिस्थिती बघता सरकारकडून आजपासून पंचनामे सुरु करण्यात करण्याचा आदेश जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. याबाबतची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार, आजपासून पुरग्रस्त भागांचे पंचनामे सुरु करण्यात येणार असून तात्काळ पुरग्रस्त भागातील लोकांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर, पुरग्रस्त भागातील नागरिकांना अन्नधान्याचीही मदत सरकार आजपासून करणार आहे. राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे अनेक भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे “आम्हाला मदत करण्यात यावी” अशी मागणी नागरिकांकडून सरकारला करण्यात आली होती. त्यानंतर या मागणीचा विचार करून सरकारने ही घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात या पावसाने नुकसान केले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी लावलेली नुकतीच पिके जमीनदोस्त झाली आहेत. तसेच गुरांना देखील चारा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे अशा स्थितीत आम्ही काय करावे असा सवाल शेतकऱ्यांनी सरकारला विचारला आहे.

दरम्यान, राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरूच असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. या मुसळधार पावसामुळे काही दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. सध्या रायगडमध्ये ही मुसळधार पाऊस सुरू असताना प्रशासन यंत्रणा मदत कार्य पोहोचवत आहे. दुसरीकडे अनेक भागातील नद्यांचे पात्र गच्च भरले आहेत. यामुळे आजूबाजूच्या परिसरासाठी धोका निर्माण झाला आहे. अशा सर्व ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.