युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील नागरिक अडकले; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया ने युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारले असून युक्रेन मधील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले सुरू आहेत. भारतातील 20 हजार नागरिक युक्रेन मध्ये स्थायीक असून अनेक विद्यार्थ्यांचा देखील त्यात समावेश आहे. युक्रेन मधील एकूण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून मराठी नागरिकांच्या सुटकेसाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक विशेषत: विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांची तिथे काय व्यवस्था आहे तसेच त्यांना परत सुखरुप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत”, अशी माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे

दरम्यान, रशिया आणि युक्रेनच्या युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता हस्तक्षेप करावा अशी मागणी भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ इगर पोलिखा यांनी केली आहे. नरेंद्र मोदी हे प्रभावशाली नेते आहेत. त्यांनी काहीही करून पुतीन आणि आमचे राष्ट्राध्यक्ष जेनेंस्की यांच्यात चर्चा घडवून आणावी. मोदींनी या प्रकरणी दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Comment