न्यूयॉर्क । कोरोनाव्हायरसविरोधात जगभरातील देश लढा देत आहेत. कोरोनाला पराभूत करण्यासाठी लसीकरण देखील केले जात आहे. दरम्यान, एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की,’कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर जे लस घेत नाही त्यांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असतो.’
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज अँड प्रिव्हेन्शन नावाच्या शास्त्रज्ञांनी लोकांना आवाहन केले आहे की, जर तुम्हांला कोरोना झाला असेल तर वेळेवर लस घ्या. कारण एकदा संसर्ग झाल्यास डेल्टा व्हेरिएन्टचा जास्त धोका असतो. रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, लस घेतलेल्या लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवली जात असल्याचे पुरावे प्रयोगशाळेत आहेत.
CDC चे संचालक रोशेल व्हॅलेन्स्की म्हणाले की,” जर तुम्हाला आधी कोरोनाची लागण झाली असेल तर नक्कीच लस घ्या. लस घेणे हा स्वतःचे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि हे विशेषतः महत्वाचे आहे कारण देशात कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएन्ट वेगाने पसरत आहे.
या नवीन प्रकारामुळे होणाऱ्या पुनर्संसर्ग बद्दल माहिती अजून कमी आहे. परंतु अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी UK च्या डेटावरून अशी शक्यता व्यक्त केली आहे की, डेल्टा व्हेरिएन्ट सह पुन्हा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. जर तुम्हाला गेल्या सहा महिन्यांत कोरोनाची लागण झाली असेल तर अल्फा व्हेरिएन्ट पेक्षा डेल्टामध्ये पुन्हा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे.