हॅलो महाराष्ट्र आॅलनाईन | गोवा विधानसभेत अपेक्षेप्रमाणे काॅंग्रेस आणि भाजपा यांच्यात काटे की टक्कर सुरू असल्याचे सकाळी येत असलेल्या आघाडीवरून दिसत आहे. तर तिसरा पर्याय दिणाऱ्या आम आदमी पार्टीला गोवेकरांनी नाकारले असल्याचे दिसून येत आहे. कारण सकाळी 40 जागाचे कल आले होते. त्यापैकी एकाही जागेवर आम आदमी पार्टी आघाडीवर नसली होती.
गोव्यात भाजप आणि काॅंग्रेसमध्ये मोठ्या घमासमान पहायला मिळाले. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास 40 जागाचे कल होते. त्यामध्ये काॅंग्रेसने 20 तर भाजपने 16 जागावर तर इतरांनी 5 जागेवर आघाडी घेतली होती. मात्र आम आदमी पार्टीची पिछेहाट दिसून आली. तर स्थानिक मगोप हा पक्षही पिछेडीवर होता.
गोव्यात पणजीमधून भाजपचे बंडखोर व अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर हे आघाडीवर होते. त्यामुळे सत्ता स्थापनेत भाजप आणि काॅंग्रेस कोण बाजी मारणार की अपक्षांची साथ घ्यावी लागणार हे थोड्या वेळात कळणार आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते देवेद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.