कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
स्वच्छ सर्वेक्षण 2021 या सर्वेक्षणामध्ये विजेत्या नगरपालिकांचा आज दिल्ली येथे शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात कराड नगरपालिकेस एक लाख लोकसंख्येच्या आतील गटात ‘थ्री स्टार’ नामांकनासह ‘स्वच्छ शहर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
केद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, आरोग्य अभियंता आर डी भालदार, अभियंता एआर पवार, नगरसेविका स्मिता हुलवान यांनी आज स्वीकारला.
मध्य प्रदेशातील इंदूरने भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून अव्वल स्थान कायम राखले आहे. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 हे शहर आता सलग पाच वेळा भारतातील सर्वात स्वच्छ म्हणून निवडले गेले आहे. आज जाहीर झालेल्या 6 व्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये सूरत आणि विजयवाडा यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.
दरम्यान 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली देशातील सर्वात 3 स्वच्छ शहरांना अनुक्रमे विटा, लोणावळा व सासवड या नगरपरिषदेंना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.