Wednesday, June 7, 2023

शरद पवारांना कसे काय मोदींच्या डोक्यातील विचार कळतात?; सुब्रमण्यम स्वामींचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीहि मोदींवर टीका केली होती. त्यांच्यानंतर आता भाजपे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदी यांच्यवर निशाणा साधला आहे. “मोदींच्या डोक्यातील विचार शरद पवार यांना कसे कळतात?असा टोला सुब्रमण्यम् स्वामी यांनी पवारांना लगावला आहे.

भाजपे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द केले आहेत. आता लोक सांगत आहेत की मोदी शेतकऱ्यांना समजावण्यात अपयशी झाले, म्हणून हे कायदे रद्द केले. पण या निर्णयामागे कोणता हेतू होता, याची आम्हाला चिंता नाही. आता कायदा रद्द झाल्यानंतर निवडणूक आल्या म्हणून कायदा रद्द करण्यात आला असे म्हंटले जात आहे.

निवडणुकीच्या पार्शवभूमीवर कायदा रद्द केल्याने याचा अर्थ बाकी सगळे मूर्ख आणि फक्त शरद पवार बुद्धीशाली आहेत, असे आम्ही तरी कसे मानायचे,” अशी टिप्पणी डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांनी केली. तिन्ही कृषी कायद्यांबाबत विरोधी पक्षांनी केवळ टीका केली. कोणतीही सकारात्मक गोष्ट केली नाही. विरोधकांकडे कोणतीही योजना नाही. शेतकऱ्यांचे जेवढे शोषण काँग्रेसच्या काळात झाले, तेवढे आजवर कधीही झाले नसल्याची टीका सुब्रमण्यम् स्वामी यांनी केली.