एसटी महामंडळ हि काय बाप जाद्याची प्रॉपर्टी आहे काय?; गोपीचंद पडळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 11 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचायांकडून आंदोलन केले जात आहे. दरम्यान आज कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत,भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थिती लावली आहे. पोलिसांनी आझाद मैदानातून आंदोलक बाहेर पडू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एसटी महामंडळ हि काय बाप जाद्याची प्रॉपर्टी आहे काय? अशी घणाघाती टीका पडळकर यांनी केली आहे.

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत एसटीच्या महिला कर्मचारी तसेच आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांची पत्नी यांच्या हस्ते आम्हीही आता पोलिसांकडे साडी-चोळी आणि नारळ दिला आहे. आणि त्यांना सांगितले आहे की, तुम्ही परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर जाऊन साडी-चोळी आणि नारळ द्यावी.

राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्याचा विषय संपवायचा नाही. राज्य सरकार एसटी राज्य सरकारमधील तीन पक्षांचा एसटीच्या जागांवर डोळा आहे का? महाविकास सरकार एसटी कामगारांच्या आत्महत्यांवर चर्चा करत नाही. सरकारच्या तिन्ही पक्षांचा हा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे का? पोलीस प्रशासनाने आझाद मैदानात पोलिसांची संख्या वाढवली आहे. या ठिकाणी काय आतंकवादी आले आहेत काय? अतिरेकी असल्यासारखे पोलीस बंदोबस्त लावला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहणार आहे, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.