हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या महागाईच्या काळात आपल्याला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय हवा असेल तर PPF चांगला ठरेल. मात्र, आपण PPF मध्ये गुंतवणूक केल्यानंतर काही कारणास्तव आपले खाते बंद झाले तर… आता यासाठी काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण यामध्ये गुंतवलेले आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील. तसेच हे खाते आपल्याला पुन्हा सुरू देखील करता येईल. कोणत्याही व्यक्तीला फक्त एकच पीपीएफ खाते उघडता येते. तसेच यामध्ये केलेली गुंतवणूक ही कर सवलतीच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाची ठरेल. कारण यामधील गुंतवणुकीवर आपल्याला कर कपातीचा लाभ देखील मिळतो. याशिवाय मॅच्युरिटीची रक्कम आणि व्याजाचे उत्पन्नही टॅक्स फ्री आहे. चला तर मग आज आपण बंद झालेले आपले PPF खाते पुन्हा कसे सुरु करावे याबाबतची माहिती जाणून घेउयात…
पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये जाऊन पीपीएफ खाते उघडावे लागेल. यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. यामध्ये, एका वर्षात किमान 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच जर आपण किमान गुंतवणुकीची अट पूर्ण केली नाही तर पीपीएफ खाते बंद होईल.
PPF खाते बंद का होते ???
जर कोणत्याही पीपीएफ खातेधारकाने एखाद्या आर्थिक वर्षात या खात्यामध्ये किमान रक्कम जमा केली नाही तर हे खाते बंद होते. PPF मध्ये, 15 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी असतो. जो संपल्यानंतरच ग्राहकाला व्याजासहीत त्याची रक्कम दिली जाते. हे व्याज दरवर्षी शिल्लक रकमेमध्ये जोडले जाते. जे बंद झालेल्या पीपीएफ खात्यावरही लागू असेल. सरकारकडून वेळोवेळी यासाठीचे व्याजदर निश्चित केले जातात. हे लक्षात घ्या कि, मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी बंद केलेले पीपीएफ खाते कायमचे बंद करता येत नाही. मात्र, जर एखाद्याला ते पुन्हा सुरु करायचे असेल, तर हे काम मुदतपूर्तीच्या तारखेआधी कधीही करता येते. पीपीएफ पासबुकमध्ये मॅच्युरिटीच्या तारीखेची नोंद केलेली असते.
अशाप्रकारे पुन्हा सुरु करा
बंद केलेले पीपीएफ खाते पुन्हा सुरु करण्यासाठी आपल्याला खाते उघडलेली बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एक लेखी अर्ज द्यावा लागेल. यासाठी 500 रुपयांसोबत वार्षिक 50 रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क वार्षिक आधारावर द्यावे लागेल. हे जाणून घ्या कि, खातेदाराला बंद खात्यातील शिल्लक रक्कम मॅच्युरिटीपूर्वी रिवाइव करता येणार नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=55
हे पण वाचा :
Gold Price Today : गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पहा आजचे नवे दर
Investment : ‘या’ सरकारी योजनांमध्ये 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करून मिळवा जोरदार रिटर्न
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने दीर्घ कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा
देशातील Moto G32 बनला सर्वात स्वस्त फोन ! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
Bank of Baroda कडून रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ, पहा नवीन व्याजदर