मुख्यमंत्र्यांनी सातारकरांची मने जिंकली – शिवेंद्रराजे भोसले

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत आदेश द्यायचे असे वक्तव्य काल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी साताऱ्यात महाजनादेश यात्रेच्या सभे दरम्यान केले होते हे वक्तव्य करून 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींनी केलेल्या मागण्या मान्य करून सातरकरांची मने जिंकली आहेत.

सातारच्या हद्दवाढीचे घोंगडे गेली कित्येक वर्षे भिजत पडले होते त्या बाबत या आधी सुद्धा शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा केली होती तसेच काल झालेल्या कार्यक्रमाच्या भाषण दरम्यान सुद्धा शिवेंद्रराजेंनी हद्दवाढ आणि साताऱ्यातील रस्ते कॉन्क्रीट चे करण्यासाठी मागणी केली होती आज कराड येथे मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही मागण्या मान्य झाल्याचे सांगून सातरकरांची मने जिंकली आहेत. हद्दवाढ झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगून रस्त्यांसाठी 50 कोटी मंजूर झाल्याचे सुद्धा सांगितले एकूणच काय काल बोललेले शब्द 24 तासात पूर्ण करून मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींचा आदेश पूर्ण करून दाखवला.