Thursday, March 30, 2023

कर्जत जामखेड : रोहित पवारांना धक्का ; राष्ट्रवादीच्या ताकतवान स्थानिक महिला नेत्या भाजपच्या वाटेवर

- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी |  शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या अडचणी वाढवण्यात त्यांचे प्रतिस्पर्धी राम शिंदे यशस्वी होताना दिसत आहे. कारण राम शिंदे स्थानिक राष्ट्रवादी संघटनात्मक दृष्ट्या खीळखिळा करण्याच्या तयारीत असल्याचे पाहण्यास मिळते आहे.

रोहित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु होण्याआधी राष्ट्रवादीतून कर्जत जामखेड मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असणाऱ्या मंजुषा गुंड भाजपच्या वाटेवर आहेत. त्या भाजपमध्ये गेल्यास राम शिंदे यांच्या प्रचाराच्या वेळी मंजुषा गुंड राष्ट्रवादीच्या घराणेशाहीवर चांगल्याच बरसणार हे मात्र नक्की. त्यामुळे मंजुषा गुंड यांचा भाजप प्रवेश रोहित पवार यांच्यासाठी धक्का मानला जाणार आहे.

- Advertisement -

मंजुषा गुंड यांनी राम शिंदे यांच्या विरोधात विधानसभा लढण्यासाठी केलेली तयारी आता राम शिंदे यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. रोहित पवार यांच्या झंझावती प्रचाराने हैराण झालेल्या राम शिंदे यांना मंजुषा गुंड यांच्या भाजप प्रवेशाने दिलासा मिळणार आहे.