दिव्यांग मतदारांसाठी २५० व्हीलचेअरर्स; सोलापूर महानगरपालिकेचा उपक्रम

येत्या २१ तारखेला संपूर्ण राज्यासह सोलापूर शहर मध्य, उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. याकरिता सोलापूर शहर प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाला येणाऱ्या दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून सोलापूर महानगरपालिकेकडून दिव्यांग मतदारांसाठी २५० व्हीलचेअर्सची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

काँग्रेसला मतदान करून महापुराचा बदला घ्या – जयंत पाटील

महापुराच्या काळात भाजप सरकारने मदत केली नाही. मंत्री व आमदारांनी सांगलीत येऊन शो बाजी केली. पुरामुळे सात दिवस जनतेचे आतोनात हाल झाले. त्याचा बदला घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसला साथ द्यावी व कमळाबाईने दिलेला त्रास वसूल करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. महाअघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडी येथील राम मंदिरसमोर सभा पार पडली. या सभेत आ.जयंत पाटील बोलत होते. सभेला विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, संजय बजाज, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात मोदी-शहांच्या सभांचा धुराळा ! सोनिया गांधी, प्रियांका गांधी आहेत तरी कुठे?

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. एकीकडे भाजप – शिवसेनेला त्यांची सत्ता टिकवून ठेवायची आहे, तर दुसरीकडे ‘आघाडी’साठी ही निवडणूक त्यांचं राजकारणातील भविष्य ठरवणारी आहे. मात्र, असं असलं तरी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापासून दूरच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकांकडे सोनिया गांधींनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

राष्ट्रवादीचे सरकार आल्यावर तीन महिन्यांत सातबारा कोरा करणार – अजित पवार

युती शासनाने शेतकऱ्यांची पाच वर्षात अत्यंत वाईट अवस्था केली आहे त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली असून सध्या शेतकऱ्यांची स्थिती हालाखीची आहे जर आमचे सरकार आले तर तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून दाखवणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे सभा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

तुम्हाला फक्त चैनसुख संचेती यांना नाही तर भाजपला निवडून द्यायचे आहे – स्मृती इराणी

मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा आज मलकापूर येथे दौरा होता. रोड शो झाल्यानंतर संचेती यांच्या प्रचारार्थ प्रचार सभाही घेण्यात आली. प्रचार सभेत स्मृती इराणी यांनी चैनसुख संचेती आणि स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मी स्वयंपाक करेन, पण अजित पवारांचे पाणी आपल्याला चालेल का? – उद्धव ठाकरे

”जेवणाच्या ताटात पवार खडे का टाकतात ? गरिबांसाठी १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले यात काय वाईट? याच गरिबांसाठी स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावर आली तरी करेन. मी स्वयंपाक करेन, पण अजित पवार पाणी देतील ते पाणी आपल्याला चालेल का? असा सवाल उपस्थितांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शरद पवारांवर सुद्धा हल्लाबोल केला. कोल्हापूर उत्तर शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक,  अरुण दुधवडकर यांच्यासह भाजप आणि सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात ६ उमेदवारांच्या निवडणूक खर्चात तफावत

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात आज निवडणुक खर्च निरीक्षक दिक्षित यांच्याकडुन १२ उमेदवारांची निवडणुक खर्चाच्या वेळापत्रकानुसार खर्चाची दुसरी तपासणी पुर्ण करण्यात आली. या तपासणीमध्ये ६ उमेदवारांच्या खर्च अहवालामध्ये खर्चामध्ये तफावत आढळून आली आहे.

धनाभाऊंचे पंकजा ताईंना ओपन चॅलेंज, ‘ट्रम्प जरी आणले तरी माझा विजय निश्चित’

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येणार आहेत. परळीत भाजपकडून पंकजा मुंडे, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे या दोघा भावंडात थेट लढत होत आहे. १७ तारखेला मोदी परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ येत आहेत. तर दुसरीकडे १८ तारखेला याच परळीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून भाजप उमेदवार दहशतीत आहेत, असं सांगत नरेंद्र मोदीच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणलं तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असा दावा धनंजय मुंडेंनी केला.

‘सुरेश खाडेंना पाला पाचोळ्यासारखे मतदार उडवून लावतील’- राजू शेट्टी

‘भाजपच्या आमदारांना सत्तेचा माज आला आहे. विरोधकांना पालापाचोळा व कचरा म्हणणाऱ्या सुरेश खाडेंना मतदारच पालापाचोळ्यासारखे उडवून लावतील. त्यांची सत्तेची मस्तीच मतदारच उतरवतील’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मिरजेतील पत्रकार परिषदेत केली. यावेेळी विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, महेश खराडे, संदीप राजोबा, तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ओवेसींनी घेतली ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांची भेट, ‘बाळासाहेबांना’ समजावण्याची घातली गळ

औरंगाबाद प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज अखरेचा दिवस आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची एकत्र निवडणुक लढवण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामागचे कारण म्हणजे, औरंगाबाद येथे एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीत ओवेसी यांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना प्रकाश आंबेडकरांना आघाडीसाठी समजावण्याची विनंती केली. याबाबत सविस्तर वृत्त … Read more