बेलवर आहात, आता खटला चालणार आहे ;भुजबळांना मुख्यमंत्र्यांची चेतावणी

0
44
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | जामीनावरबाहेर आल्यावर भाजपवर टीका करून प्रकाश झोतात आलेले राष्ट्रवादीचे नेते छगन  भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलीच चेतवणी दिली आहे. बेलवर आहात आता देखील चालणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते नाशिक येथील प्रचार सभेत बोलत होते.

छगन भुजबळ यांच्या सारखा नटसम्राट महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही. भ्रष्टाचार केला म्हणूनच जेल मध्ये टाकल. आता आगे आगे देखो होता हे क्या. बेलवर आहेत उद्या तुमच्यावर खटला चालणार आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा जेल मध्ये जाणर आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

शरद पावर यांनी प्रचारासाठी भाड्याने नेता लावला आहे. त्याचे इंजिन पवारांनी भाड्याने घेतले आहे. कारण शरद पवारांचे इंजिन घरीच बंद पडले आहे. म्हणून त्यांना मनसेच इंजिन ओढत आहे असे मुख्यमंत्रीम्हणाले आहेत. युतीच्या सरकारच्या काळात झालेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. मात्र  त्यांच्या भूल थापांना जनता बळी पडणार नाही असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here