रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांवर स्वखर्चाने करणार उपचार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा

Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून देण्यात आले आहेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची घोषणा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण ?
मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ बुधवारी एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) दिले आहेत. तसेच त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवली आहे.

हे पण वाचा :
तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!

ED ची छापेमारी : ‘Vivo’सह भारतातील 44 कंपनीवर धडक कारवाई

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेच; फोटोंनी वेधलं लक्ष्य  

शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेंचं; फोटोंनी वेधलं लक्ष्य