हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकार बंजारा समाजासाठी बोर्डाची स्थापना करणार असून त्यासाठी 50 कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. आज पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी बंजारा समाजासाठी विविध घोषणा केल्या.
राज्य सरकार बंजारा समाजाच्या पाठीशी उभा आहे. बंजारा समाजाच्या मुलामुलींना यापुढे कधीही शिक्षणासाठी वंचित राहावं लागणार नाही. त्यांच्या शिक्षणासाठी जो काही खर्च पडेल तो सगळं खर्च सरकार करेल. त्यांना होस्टेलसाठी जी काही तरतूद लागेल ती सुद्धा शासन करेन असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटल. बंजारा समाजासाठी नवी मुंबईमध्ये भव्य असं बंजारा समाज भवन उभारण्यात येईल अशीही घोषणा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली.
https://www.facebook.com/mieknathshinde/videos/1238297060106198/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=2Rb1fB
ज्या काही बंजारा समाजाच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. बंजारा समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी सरकारचा पाठिंबा आहे. आपलं सरकार म्हणजे बंजारा समाजाचे सरकार आहे. हे सरकार आल्यांनतर बंजारा समाजासाठी ५९३ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलाय असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.