हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक- मुंबई महामार्गावर मुंढेगाव गावाजवळील जिंदाल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. आगीत 11 जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. कंपनीत सुर्दैवाने जास्त लोक अडकले नाहीत. कंपनीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्नाची भेट घेतली. “घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तातडीची मदत देण्यात येत असून जखमींचा उपचाराचा सर्व खर्च शासनाकडून केला जाईल,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास इगतपुरीमधील जिंदाल कंपनीत भीषण स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती समजताच अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जिंदाल कंपनीत सुमारे १ हजारहुन अधिक कामगार असून यातील 100 हुन अधिक कामगार अडकल्याची शक्यता आहे. आगीच्या या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जिंदाल कंपनीत सुर्दैवाने जास्त लोक अडकले नाहीत. कंपनीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. कंपनीतील एका ठिकाणी अद्यापही तीन लोकं अडकले आहे.
Maharashtra | Massive fire breaks out in a factory located in Mundegaon village of Igatpuri tehsil in Nashik district
Details awaited. pic.twitter.com/jQhSHqZCX7
— ANI (@ANI) January 1, 2023
बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे. तसेच, आगीवर नियंत्रणासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.
मंत्री अधिकारी घटनास्थळी..
सद्यस्थितीत घटनास्थळावर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डी.गंगाथरण यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घटनेबद्दल अधिक माहिती दिली.