मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

0
129
MODI SHINDE
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मोदींना विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती भेट म्हणून दिली.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आनंद झाला. राज्याच्या विकासाबाबत चर्चा केली. सर्वसामान्य जनतेचे सरकार असून शेतकऱ्यांचे, कष्टकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या अस मोदींनी आपल्याला सांगितले आणि महाराष्ट्राला केंद्राकडून मदत मिळेल अस आश्वासन देखील मोदींनी दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले

मोदींची भेट घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली होती. वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण दिल्लीत आलो आहोत अस एकनाथ शिंदे यांच्या कडून सांगण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here