देश चंद्रावर चालला तरी काहीजण घरातून ऑनलाइन काम करत होते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे देश चंद्रावर चाललायं, पण काही लोक घरात बसून ऑनलाइन काम करायचे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाव न टोला लगावला आहे. आज परभणी येथे राज्य सरकारच्या शाषन आपल्या दारी हा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चौफेर टोलेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला.

एकनाथ शिंदे म्हणाले, जग चंद्रावर चालालायं, पण काही लोक घरात बसून ऑनलाइन काम करायचे. परंतु आम्ही त्यांना असा झटका दिला कि ते ऑनलाईन वरून लाईनीवर आणले, तरीही त्यांचे भोंगे रोज वाजत आहेत. एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने त्यांचा जळफळाट होत आहे. तिकडे पाटण्यात विरोधक एकत्र जमले आणि द्वेषाची, राजकारणाची खिचडी शिजवत होते. पण त्यावर मला काही बोलायचे नाही, ज्यांना राजकारण करायचे त्यांना ते करू द्या, आपण मात्र काम करायचं असं म्हणत शिंदेनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार अजित पवार आमच्या सोबत आले. अजितदादांनी तर जाहीर पणे सांगितले की देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही. अजितदादांबद्दल काहींनी गुगली टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना ते करू द्या. त्यांनाही अजित पवारांची भूमिका पटते आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर सुद्धा टीका केली.