हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जत तालुक्यातील गावांमुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यातच आता कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील दुष्काळी भागात पाणी सोडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जत तालुक्यासाठी मोठी घोषणा केली आहे. जतमधील पाणी प्रश्न सोडण्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची माहिती शिंदेनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील लोकांच्या समस्या ऐकून घेत पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये आम्ही 2 हजार कोटींचे टेंडर काढणार असल्याचे आश्वासन दिलं. यावेळी ते म्हणाले की, रात्री दीड वाजता जतमधील लोक आले होते. त्यांनी जत तालुक्याचा नकाशा आणला होता यावेळी नकाशावर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. आम्ही तुमच्यासाठी 2 हजार कोटींचं टेंडर काढत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले
आम्ही म्हैसाळ योजनेची व्याप्ती वाढवण्याचं काम करतोय. जतमधील जी काही 40-50 गावे आहेत त्यांना पाणी मिळायला हवं. या विषयावर बाकीचे लोकं राजकारण करत असतील तर त्यांना करु द्या. त्यांच्या राजकीय आरोपांना उत्तर देणार नाही. मी कामातून उत्तर देईन असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनाही इशारा दिला.