सभागृहात सांगतोय, कुणालाही धक्का न लावता मराठा आरक्षण देणार- मुख्यमंत्री ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे. कुणालाही धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहात दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाजपला टोले चांगलेच लगावले.

”मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात, ही लढाई आम्ही जिंकणारच, ही लढाई लढत असताना मध्येच कुणी टुमणं काढलं इतर समाजाचं आरक्षण काढणार का वगैरे..पण मी सभागृहात ग्वाही देतो, मराठा आरक्षण देताना अन्य कुणाचं आरक्षण काढणार नाही. हे रेकॉर्डवर आहे, समाजात जे कोणी आग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर पाणी टाकावं लागेल. मी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने बोलतोय”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज जशीच्या तशी आहे, भूमिकेत बदल नाही, काहीही बदलेलं नाही असं स्पष्टीकरणही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. विरोधकांच्या सर्वच आरोपांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही, माझ्या सहकारी मंत्र्यांनी उत्तर दिलं आहे, तुम्ही मानगुटीवरच बसायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही काही करु शकणार नाही”, अशा परखड शब्दांत उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा संचार घेतला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment