कार्यालयीन वेळेमध्ये होऊ शकतो बदल! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | दूरदृश्य प्रणालीद्वारे नीती आयोगाची सहावी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार करण्यात आली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यालयीन वेळेच्या संदर्भात एक महत्त्वाची मागणी केली आहे. यामध्ये कार्यालयीन वेळामध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केल्याचे समजते.

कोविड-19 चा लढा अजून संपला नाही. आपण सर्व त्यासोबत लढत आहोत. आपण सध्या व्हिडीओकॉन कॉन्फरन्सिंग आणि इतर माध्यमांमधून भेटत आहोत. कार्यालतीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक मानसिकता म्हणजे दहा ते पाच या वेळेची मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे खूप गरजेचे आहे. यासाठी केंद्राने धोरण आखून द्यावे’. असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य सरकारने गेल्या वर्षभरात माहिती तंत्रज्ञान वर भरपूर भर दिला. इंटरनेट सुविधा सर्व गावांमध्ये पोहोचणे सरकारचे उद्दिष्ट असून भारत नेटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा जाळे पसरवणे हे सर्व ठिकाणी सुरू आहे. दुर्गम भागातील अडीच हजार पेक्षा जास्त गावे आणि खेड्यांमध्ये आजही मोबाईल कनेक्ट पोहोचलेली नाही. सरकारने यामध्ये लक्ष घालून या सुविधा राज्याला कशा प्रकारे लवकर पोहोचतील ते पहावे. सोबतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा व्हावी म्हणून, राज्य शासन प्रयत्न करीत आहे असून केंद्राने यासाठी वाढीव साहाय्य यासाठी करावे. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment