हिंदुत्त्वाचा गजर.. चलो संभाजीनगर; मुख्यमंत्र्यांच्या सभेचा चौथा टिझर रिलीज

0
128
Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 8 जून ला औरंगाबाद येथे ऐतिहासिक सभा होणार आहे. कोरोना नंतर तब्बल 2 वर्षांनी उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेकडून सभेचा टिझर रिलीज करण्यात आला असून हिंदुत्त्वाचा गजर.. चलो संभाजीनगर अशी हाक शिवसैनिकाना देण्यात आली आहे.

काय आहे टिझर मध्ये?

उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या टिझर मध्ये सुरुवातीलाच हिंदुत्त्वाचा गजर.. चलो संभाजीनगर अस आवाहन शिवसैनिकाना करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला स्वाभिमानी सभा अस म्हंटल आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेचा दाखला देत औरंगाबाद नव्हे तर संभाजीनगर हे नाव आम्ही दिलं, शिवसेनेनं दिलं अस म्हंटल आहे. खरे हिंदुत्व म्हणजे काय हे संभाजीनगर सांगणार अस म्हणत अप्रत्यक्ष पणे भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. नजर जाईल तिथवर भगवा फडकणार, लाखोंच्या संख्येने या… हिंदुत्त्वाचा गजर.. चलो संभाजीनगर अशी हाक शिवसैनिकाना देण्यात आली आहे.

https://www.instagram.com/tv/CefNNaap1_b/?igshid=YmMyMTA2M2Y=

दरम्यान, 8 जूनला औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानात उद्धव ठाकरे यांची मोठी सभा आयोजित करण्यात आली असून मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला ते काय उत्तर देणार हे पाहावे लागेल, तसेच अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेब च्या कबरीला माथा टेकला होता त्यावर उद्धव ठाकरे कोणत्या शब्दांत समाचार घेतात याकडे सर्व शिवसैनिकांचे लक्ष असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here