मुख्यमंत्र्यांची राज्यातील बड्या उद्योगपतींशी चर्चा, लसीकरण केंद्रे आणि ऑक्सीजन साठी मदतीचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.सध्याची परिस्थिती पाहता ऑक्सिजनची नितांत गरज आहे. याशिवाय उद्योगांनी बेड सुविधा वाढवणे चाचणी केंद्रे वाढवणे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य ती मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मोठ्या उद्योजकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले आहे.

कोरोनाची तिसरी लाट आल्यास उद्योग-व्यवसाय यांचे नुकसान होऊ नये.अर्थ चक्राला झळ पोहोचू नये.म्हणून उद्योगांनी आत्तापासून कोविड सुसंगत कार्य पद्धतीने नियोजन करावे. या संदर्भात अशा सुविधा उभारण्यात व कार्यप्रणाली अवलंबावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांना प्रतिसाद देताना कोविड विरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्या बरोबर आहे. असा विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला. राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयक टास्क फोर्स आहे. तसाच कोविड संदर्भात राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांचा एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावा असेही निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. बैठकीत राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्य आपापल्या परीने ऑक्सिजनची उपलब्धता तातडीने करून देण्यात येत आहे. असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी सांगितले. याशिवाय विलगीकरण, बेड सुविधा वाढवून, चाचणी केंद्र स्थापन करणे आणि लसीकरण वाढवणे यामध्ये उद्योजक पुढाकार घेऊ लागले आहेत कारवाई सुरू करतील असंही सांगण्यात आला आहे.

सर्व उद्योगपती हे राज्याच्या परिवारातल्या असून या संकट समयी त्यांनी पुढे येऊन मदत करावी असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कोविल संदर्भातील सुविधा उभारणे किंवा याविषयी अत्यावश्यक बाबींमध्ये राज्य शासन तातडीने मदत करेल असेही ठाकरे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment