उदयनराजेंनी पाठवलेले साडे चारशे रुपये साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले परत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभर प्रचंड प्रमाणावर वाढलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाकरे सरकारने विकेंड लॉकडाउन पुकारला होता. शासनाच्या आदेशात सुधारणा करत सातारा जिल्हा प्रशासनाने अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशास विरोध दर्शवत भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजेंनी शनिवारी साताऱ्यात पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली भीक मांगो आंदोलन केले होते.

आंदोलनावेळी उदयनराजेंनी राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनावर टीका करत आपला संताप व्यक्‍त केला होता. यानंतर त्यांनी हातात थाळी घेत उपस्थितांकडून पैसे जमा केले. भीक मांगो आंदोलनातून जमा केलेल्या साडेचारशे रुपयांची रोकड असणारी थाळी घेऊन ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या वेळी त्यांनी लॉकडाउन मागे घ्यावाच लागेल, न घेतल्यास असंतोषाचा भडका उडेल व त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला होता.

राजेंनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर सातारा जिल्हा प्रशासन काय निर्णय घेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.भीक मागो आंदोलनात जमा झालेले.साडे चारशे रुपये उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले होते.ते पैसे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रक्कम खूप कमी आहे या अटीवर स्वीकारणे ना कबूल केले.आणि ते पैसे मनी ऑर्डर करत उदयनराजे यांच्या साताऱ्यातील पत्त्यावर परत पाठवून दिले आहेत.

यावर अजून तरी उदयनराजे यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. उदयनराजे यावर काय भूमिका घेतात हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like