कोरोना काळात फडणवीस दौरे करतायत तर उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडत नाही- चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । कोरोना संकटात राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीवरून बाहेर पडायला तयार नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, फडणवीस रोज कुठे ना कुठे फिरताहेत. त्यांना काय कोरोनाची भीती नाही का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र बाहेर पडतच नाहीत. आतापर्यंत केवळ २ वेळा ते मातोश्रीवरुन बाहेर पडले. कोणी मातोश्रीवर गेले तरी त्यांना मुख्यमंत्री त्यांना भेटायला तयार होत नाहीत. यापूर्वी २००४ साली शरद पवार मातोश्रीवर गेले होते. परंतु, गेल्या ६ महिन्यांत शरद पवार यांनी मातोश्रीवर ३ ते ४ फेऱ्या मारल्या आहेत. त्यांना इतक्या वेळा तिकडे जायला लागू नये असे, वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

दरम्यान, आजच्या पत्रकारपरिषदेत चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील हातावर पोट असलेल्या लोकांना एका महिन्यासाठी नोकरी देणार असल्याचे जाहीर केले. तसेच यापुढील काळात लॉकडाऊन झेपणार नाही, असे मतही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”