मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही कायम आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी राज्यातील लॉकडाऊन पुढील १५ दिवस कायम राहणार असल्याची महत्वाची घोषणा ठाकरे यांनी केली. लोकांवर निर्बंध लादणे हे सर्वात वाईट आहे. जी जनता आपल्यावर प्रेम करते त्यांच्यावर निर्बंध लादणे हे कटू काम आहे. पण सर्वांच्या सुरक्षेसाठी निर्बंध लावावे लागत आहेत. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल.
हा विषाणू आता सुटला आणि तिसरी लाट आली तर आपल्याला फार कठीण जाईल. त्यामुळे फार काळजी घ्यावं लागणार आहे. हे कमी होतं की काय आता काळी बुरशी आलेली आहे. राज्यात म्युकोरमायकोसीसचे तीन हजार रुग्ण आहेत. या विरोधात लढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत आहोत असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल.
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२ टक्क्यांवर आलाय ही दिलायासादायक बाब आहे. यावेळी आपण कडक निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसतंय. शहरी भागात संख्या कमी होतेय तर ग्रामीण भागात संख्या हलकीशी वाढताना दिसत आहे,” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
४५ च्या वरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्रानं घेतली आहे. तर त्या खालच्या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्याची आहे. एकरकमी लसीचे पैसे देण्याचीही आपली तयारी आहे. आपण चोवीस तास लसीकरण करू. आपली क्षमता आहे. परंतु त्याला मर्यादा आहे. लसीची उत्पादन क्षमता तितकी झालेली नाही. जून महिन्यापासून लसीचा पुरवठा सुरळीत होईल असं सांगण्यात आलं होतं. जशा लसी येतील त्याप्रमाणात लसीकरणाचा वेगही वाढवणार आहोत. अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
‘आता कोरोनामुक्त गाव ही प्रत्येकाची जबाबदारी
ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आपण कोरोनामुक्त गाव असं ठरवलं तर गाव कोरोनामुक्त होईल. प्रत्येकाने घर कोरोनामुक्त करायचं ठरवलं तर आपलं घर कोरोनामुक्त होईल. माझं घर कोरोनामुक्त होईल. पोपटराव पवार आणि दोन तरुण सरपंचांनी त्यांच्या गावातून कोरोना हद्दपार केला. आपल्याला कोरोनाला हद्दपार करायचा आहे. आपल्याला कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवायची आहे. असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.