हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या काही दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन मुळे थोड्या प्रमाणात फरक पडला असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. त्यामुळे आता लॉकडाउन मध्ये शिशीलता येणार का असा प्रश्न सर्वाना पडला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात करोनाचा कहर उच्चांक गाठत असल्यानं देशभरात भीतीचं वातावरण होतं. पण मी राज्याच्या हितासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की, कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केलं. त्यामुळे हे जे काही नियंत्रण आलेलं आहे, मात्र अजुन यश मिळालेलं नाही,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे १ जूननंतरच्या निर्बंधाबद्दल सूचक विधान केलं आहे.
कोरोना विरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश नाही पण रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येतेय. रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये. याची मात्र काळजी घ्या, काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.