मास्क मुक्त महाराष्ट्र कधी होणार?? उद्धव ठाकरे म्हणतात…

uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून त्याच पार्श्वभूमीवर निर्बंधांत शिथिलता आणली गेली आहे. परंतु मास्कमुक्त महाराष्ट्र कधी होणार असा प्रश्न जनतेला पडला आहे. मात्र कोरोना अजून संपलेला नाही त्यामुळे राज्यातील जनतेला अजून काही काळ तरी मास्क वापरणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय उसर(ता.अलिबाग) येथील प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कोरोना अजून संपलेला नाही. मास्क कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. मास्क काढण्याबाबतचे आताच काही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे

आता आपल्याला जो काळ मिळाला तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. साथ शिखरावर असतांना लसीकरण करणे कितपत योग्य हे डॉक्टर सांगतील पण आता लाट कमी होत असतांना लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. लसीकरणानंतरही कोरोना लागण होते पण त्याची घातकता कमी होते, जीव वाचवण्याचे सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.